न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- आंबा खाऊन थुकल्याने चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २७) रोजी आदर्श कॉलनी, दापोडी येथे घडली. या प्रकरणी तुषार चंद्रकांत परदेशी (२६, रा. खडकी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार दिनेश संजय सावंत (२३), चांद सलीम शेख (२०), सलमान अकबर शेख (२०), आदेश संजय कांबळे (१९, सर्व रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तुषार हे व्यवसायानिमित्त सोमवारी दापोडीत आले होते. ते आंबा खाऊन जमिनीवर थुकले. याचा राग आल्याने आरोपींनी तुषार यांना मारहाण करून जखमी केले.


















