न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड । दि. २२ ऑगस्ट २०२५ :- पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सुरू करण्याची मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सध्या नागरिकांना व रास्तभाव दुकानदारांना विविध कामांसाठी पुण्यातील कार्यालयात जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. शहरासह देहू, चाकण, तळेगाव, हिंजवडी अशा औद्योगिक पट्ट्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे कार्यालय स्थानिक स्तरावर सुरू होणे आवश्यक असल्याचे लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे.
सोलापूरसारख्या ११ लाख लोकसंख्येच्या शहरात स्वतंत्र कार्यालय आहे, मग पिंपरी-चिंचवडसारख्या ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात का नसावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लाभ :
- नागरिकांची धावपळ कमी होईल
- रास्तभाव दुकानदारांचे कामकाज सोपे होईल
- शासकीय कामकाज गतिमान होईल
“३० लाख लोकसंख्येच्या शहरात अन्नधान्य वितरणासाठी स्वतंत्र कार्यालय असणे ही काळाची गरज आहे. स्थानिक स्तरावर सेवा मिळाल्यास नागरिकांचे हाल टळतील.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा…












