न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि.च्या सीएसआर निधीतून उभारलेल्या अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते झाले. या केंद्रात ८ डायलिसिस मशिन्स व अत्याधुनिक बेडची सोय करण्यात आली आहे.
या प्रसंगी मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके आदी मान्यवर उपस्थित होते. खोराटे म्हणाले की, या केंद्रामुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि जवळपासच सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांची धावपळ कमी होईल.
डायलिसिस सेंटरमध्ये प्रशिक्षित डॉक्टर, तज्ज्ञ तंत्रज्ञ, प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र बेड, आपत्कालीन सुविधा, आर.ओ. प्लॅन्ट व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.
“तालेरा, जिजामाता व आकुर्डी रुग्णालयातील डायलिसिस युनिटमुळे आरोग्य सेवांची उपलब्धता वाढली आहे. हे युनिट महापालिकेच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला बळकटी देणारे ठरेल.”
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी…












