न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ताथवडे परिसरातील एकूण २३ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. मंगळवारी (दि. २८) रोजी झालेल्या कारवाईत एकूण १७ हजार २०५ चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच, रूपीनगरमध्ये ३ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
कारवाईत ताथवडे येथील १८ आरसीसी, ३ पत्राशेड, २ वीट बाधकाम असे एकूण २३ बांधकामावर कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ३ पोलीस, वाकड ठाण्याचे २२ पोलीस, १ ब्रेकर, २ जेसीबी, १ रुग्णवाहिका, १५ मजूर यांच्या सहायाने कारवाई करण्यात आली.
तसेच, रूपीनगरमधील रूपी हाउसिंग सोसायटी येथील चालू असलेले ७ अनधिकृत बांधकामावर बुधवारी कारवाई करण्यात आली. त्यात, एकूण १३ हजार ४९६ चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.


















