न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- रावेत-प्राधिकरणमध्ये सेक्टर ३२ ए मध्ये सीएनजीवर आधारित स्मशानभूमीचे बांधकाम सुरू आहे. रहिवाशी परिसरातच ही स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. या स्मशानभूमीला नागरिकांकडून विरोध होत असून, त्या विरोधात आज बुधवारी (दि. २९) रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
लीयाबाबत कोणतीच पुर्वकल्पना देण्यात आ नाही, त्यामुळे या ठिकाणी अनेकांनी घरे विकत घेतली. या ठिकाणी सुमारे ६०० प्लॅट्स आहेत. यामध्ये दोन ते अडीच हजार नागरिक राहत आहेत. स्मशानभुमीचा ठराव २०१५ रोजी ठराव झाला आहे. आम्हाला या बाबत कोणतीच पुर्वकल्पना दिली नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे. लोकप्रतिनिधींनाही याबाबत कळविले आहे. मात्र, ते या प्रश्नाबाबत उदासिन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ आज बुधवारी (दि. २९) रोजी स्मशानभुमीच्या ठिकाणी सर्व नागरिकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हे आंदोलन होणार आहे.


















