न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑगस्ट २०२५ अखेर एकूण ३२ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये २३ जण नियत वयोमानानुसार तर ९ जण स्वेच्छानिवृत्ती घेणारे आहेत. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे उप आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. “सचोटी व जबाबदारीने दिलेल्या सेवेमुळे महापालिका वेगाने प्रगतीपथावर आहे,” असे प्रतिपादन खोत यांनी केले.
सेवानिवृत्तांमध्ये मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, उप अभियंता मोहन खोंद्रे, कार्यालय अधीक्षक साधना ढमाले, पांडुरंग मोरे, गट निर्देशक मनोज ढेरंगे, सिस्टर इनचार्ज शारदा भोर, संगीता कदम, लघुलेखक प्रशांत काळेगोरे, भांडारपाल अनय म्हसे, क्रीडा शिक्षक विजय लोंढे, ए.एन.एम. वंदना गोपकर, सुरक्षा सुपरवायझर शंकर आरोळकर, लिपिक शंकर कानडी, वायरमन संजय पांढरकर, रखवालदार मधुकर भारती, शिपाई सुनिता फाले, मुकुंद गुरव, मजूर गणपती नाईक, आया रोहिणी सोन्नयल्लू, विशाखा जाधव, गटर कुली चंद्रकांत जगताप, सफाई कामगार आशा जगताप यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य निरीक्षक संजय गेंगजे, सफाई कामगार गेनबहादूर खत्री, मैनाबाई सोनवणे, सोजर शिंदे, शेषराव वाकोडे, अन्वर गागडे, कचरा कुली संजू घोलप, मुकादम अनिल तापकीर, सफाई कामगार पोपट चव्हाण यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास प्रमोद जगताप, वैभवी गोडसे, प्रफुल्ल पुराणिक, नंदकुमार इंदलकर, माया वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.












