- अपघात झाल्यावरच येईल प्रशासनाला जाग?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- निगडी येथील पवळे उड्डाण पुलाखालील बसस्टॉपसमोरील रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. हा खड्डा बुजवला न गेल्यास कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सध्या अपघात टाळण्यासाठी त्या खड्ड्यावर प्लास्टिकचे बॅरिकेड ठेवण्यात आले आहे. मात्र त्यामुळेही धोका अधिकच वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांच्या नजरेत न आल्यास थेट अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी याकडे तातडीने लक्ष देऊन खड्डा बुजवावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर असे धोकादायक खड्डे निर्माण झाल्यानंतरही महापालिका का वेळेत दुरुस्ती करत नाही? अपघात होण्यापूर्वी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.













