न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आकुर्डी येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षिका लता अण्णा नवले (शितल भानुदास औटी) यांना शिक्षण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सोहळा २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळात पार पडला.
लता नवले यांनी दीर्घकाळापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. अध्यापनात नवनवीन पद्धतींचा वापर, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षणाची जाणीव निर्माण करणे आणि शैक्षणिक वातावरण समृद्ध करण्याचे त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या सन्मानामुळे स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने आकुर्डी परिसरातील शाळेला अभिमान वाटत आहे.













