न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- कसबा पेठ माणिक चौक येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाने यंदा “पुणे कालचे आणि आजचे” या विषयावर देखावा साकारला आहे. या माध्यमातून वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांविषयी जनजागृती करण्यात आली असून “उडता पुणे होऊ देणार नाही” ही प्रतिज्ञा मांडण्यात आली आहे.
देखावा पाहण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी भेट दिली. तसेच विदेशी पाहुण्यांनीही उपस्थिती लावली.
मंडळाची वैशिष्ट्ये म्हणजे वर्गणीची सक्ती नाही, विसर्जन मिरवणूक व गुलाल उधळण नाही, दहा दिवस ध्वनीक्षेपक वापरला जात नाही. मंडळाची स्थापना १९८४ मध्ये झाली असून त्यांचे घोषवाक्य आहे “ठेवा उत्सवाचे भान, राखा हिंदुत्वाची शान”.
गणेशोत्सवापुरतेच नव्हे तर वर्षभर दिवाळी फराळ वाटप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मदत, अनाथाश्रमांना आधार आणि पर्यावरण संवर्धन असे विविध उपक्रम मंडळ राबवते.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय पोटफोडे असून उत्सवात सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत.











