- अशी आहे प्रभागनिहाय हरकतींची आकडेवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत नागरिक, संघटना आणि राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत. महापालिकेकडे अधिकृतरीत्या प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार एकूण ३१८ हरकती दाखल झाल्या आहेत.

यामध्ये सर्वाधिक हरकती प्रभाग क्र. १० मधून ११५ प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर प्रभाग क्र. १ मधून ९८ हरकती, तर प्रभाग क्र. २० मधून ३१ हरकती दाखल झाल्या आहेत.
याशिवाय प्रभाग ६ मधून १५, प्रभाग २२ मधून ६, प्रभाग ३० मधून ६, तसेच प्रभाग ९ आणि प्रभाग ३२ मधून प्रत्येकी ७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. इतर प्रभागांतून अल्प प्रमाणात हरकती नोंदवल्या गेल्या असून काही प्रभागांत एकही हरकत आलेली नाही. दरम्यान, ‘कॉमन’ स्वरूपात देखील १ हरकत दाखल झाली आहे.
महापालिकेकडून आता या सर्व हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया राबवली जाणार असून, अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.











