- दापोडीत वाहतूक पोलिसाला धडक देत पसार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. ४ सप्टेंबर २०२५ ) :- नाशिक फाटा बीआरटी मार्गावर वाहतूक पोलिसाला धडक देत एक स्कुटरस्वार पसार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विलास केकान (वय ४२, रा. निगडी) हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी ते वाहतूक नियंत्रण करत असताना, बीआरटी लाईनचा नियम मोडून जाणाऱ्या सफेद होंडा अॅक्टीव्हा वाहनचालकाला त्यांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, संबंधिताने दुर्लक्ष करून पोलिसांना धडक दिली.
या धडकेत केकान यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या जवळील सरकारी ई-चलन मशीन खाली पडून तुटले. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून पळ काढला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम सह मोटार वाहन कायद्याचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि देशमुख करीत आहेत.


















