न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- शिक्षक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
आयुक्त शेखर सिंह यांनी व्हिडिओ संदेशातून शिक्षकांना शुभेच्छा देत, “शिक्षक हे मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे खरे शिल्पकार आहेत,” असे सांगितले. आमदार गोरखे यांनी स्वतः महापालिका शाळेत शिकल्याचा उल्लेख करून शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले.
या वर्षी बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांचा सन्मान झाला. क्रीडा शिक्षक भाऊसाहेब खैरे, पीसीएमसी पब्लिक स्कूलचे जितेंद्र कराड आणि आबासाहेब पाळवंदे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. विविध शाळांमधील प्रियंका गावडे, प्रिया नांगरे, वैशाली मामुल्वार, मनिषा कदम, अंजू सोनावणे, सखाराम पितळे यांच्यासह २३ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.











