न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आज सोमवार दिनांक १. ऑक्टो. रोजी पिंपरी-चिंचड शहर व उपनगरात परतीच्या पाऊसाने चांगलीच हजेरी लावली. वादळी पाऊस जागोजागी माणसे खिळवून ठेवत होता.
पाऊसही विभागवार कोसळण्याचा अनुभव घेताना दिसला. क्षणात चिंचवड ते क्षणात पिंपरी मग दापोडी या पध्दतीने आळीपाळीने आपल्या संततधारेने परिसराला ओलेचिंब करत असल्याचे पहावयास मिळाले.
त्यामुळे रस्त्यावर जागोजागी वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची तारांबळ उडताना दिसत होती. दुचाकी वाहनांच्या इंजीनमध्ये पाणी जाऊन अनेक दुचाकीधारक वाहने जागोजागी लावून गॅरेजमध्ये धाव घेताना दिसले. एकंदरीत आजच्या पाऊसाने नागरिकांची धावाधाव केली.