- अपघातानंतर चालक फरार, गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुरोड │ १२ सप्टेंबर २०२५ :- देहुरोड एम. बी. कॅम्प अभिवीला चौकाजवळ झालेल्या अपघातात ६० वर्षीय टेलर व्यवसायिक गंभीर जखमी झाले आहेत. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून, अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
फिर्यादी विजय इरन्ना नायडु हे देवपूजेसाठी विकासनगर येथे फुले आणण्यासाठी पायी जात असताना मागून आलेल्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड, उजव्या हाताच्या मनगटाजवळील हाड मोडले असून, उजव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची नोंद ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. भारतीय न्याय संहिता कलम तसेच मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहवा वांवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












