न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- काळेवाडी एम.एम. कॉलेजसमोर सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या मिक्सर ट्रकने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या पतीस गंभीर दुखापत झाली.
मृत महिलेचे नाव राजेश्वरी चंद्रशेखरन अय्यर (६५) असून तिचे पती चंद्रशेखरन नारायणस्वामी अय्यर (७३, रा. वैभवनगर, पिंपरी) हे जखमी झाले आहेत. दाम्पत्य डी-मार्ट, काळेवाडी येथून घरगुती सामान घेऊन दुचाकीवरून पिंपरीकडे निघाले होते.
एम.एम. कॉलेजसमोर आल्यानंतर मागून भरधाव वेगात आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात राजेश्वरी अय्यर यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक अरविंद मनोहर नागरे (२७, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) याने ट्रक निष्काळजीपणे व अविचाराने चालवला होता. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम सह मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत गुन्हा काळेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि कोरडे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.













