न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील योग पार्क क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. नुकतेच या केंद्रावर ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने तब्बल सात पदकांची कमाई केली. या क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स मधील क्लाइंबिंग वॉलकरिता कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था तसेच इतर अनुषांगिक कामे करण्याच्या खर्चास आजच्या स्थायी समिती बैठकीत आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. पिंपरी चिंचवड शहरात उभारलेल्या क्लायबिंग वॉल साठी जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असा विश्वास देखील आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत त्यांना मान्यता दिली. तसेच शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेत कामे मार्गी लावण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून आयुक्त हर्डीकर हे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिकेच्या विविध विभागांसाठी २० के व्ही ए सेंट्रलाईज यु पीएस यंत्रणा दर करारानुसार १ वर्ष कालावधीसाठी खरेदी करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मे. एलकेअर संचालित हृदयरोग केंद्रासाठी एमजेपीजेएवाय योजनेंतर्गत पुरवणी करारनामा करून सुधारित दर लागू करणे, रावेत, चिंचवड, आकुर्डी, भाटनगर, चिखली मैला शुद्धीकरण केंद्र व अंतर्गत मैलापाणी पंप हाऊस मधील मशिनरीज, उपकरणे उर्जा परीक्षण अहवालानुसार उर्जा बचतकामी व आवश्यकतेनुसार बदलणे, कुष्णानगर, से. २२ जाधववाडी, संभाजीनगर जी ब्लॉक येथील शुद्ध पाणीपुरवठा पंप हाऊसचे चालन व देखभाल दुरुस्तीविषयक कामे करणे, अशुद्ध जल उपसा केंद्र, रावेत टप्पा क्र. १, २, ३ व ४ योजनेंतर्गत पंपिंग मशिनरीचे चालन व देखभाल दुरुस्ती करणे, से. २२ जा शुद्धीकरण केंद्र येथील पंपिंग मशिनरी सबस्टेशन, वीजसंच मांडणी व जनित्रसंचाचे चालन व देखभाल दुरुस्तीचे कामे करणे, मनपाच्या रावेत स.नं. ९६ पुनावळे, व काळाखडक वाकड, स.नं. २० पिंपळे गुरव, दापोडी, रहाटणी, लांडेवाडी, चऱ्होली, बोपखेल महिंद्रा पिंपरी, से.१० व गवळीमाथा येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसचे चालण व देखभाल दुरुस्तीविषयक कामे करणे, मनपाच्या आरोग्य विभागाकडील प्रभाग क्र. ८ मधील सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची यांत्रिकी पद्धतीने (पाण्याच्या उच्चदाब फवाऱ्याच्या सहाय्याने) व मनुष्यबळाद्वारे दैनंदीन साफसफाई, देखभाल व किरकोळ स्वरूपची दुरुस्ती कामाची प्रथम मुदतवाढ देणे,मनपा अंदाजपत्राक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्याबाबतच्या खर्चास मान्यता देणे, गणेश उत्सव २०२५ च्या अनुषंगाने शासनाच्या सूचनेनुसार मनपाच्या विविध चौकांचे सुशोभीकरण व प्रसिद्धी करणाच्या खर्चास मान्यता देणे, मनपाच्या विविध उपक्रमांची आणि योजनांची चित्रफीत तयार करणेकामी झालेल्या खर्चास मान्यता देणे, महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ च्या सुधारीत अंदाजपत्रकात इडब्ल्युएस गृहनिर्माण जेएनएनयूआरएम व पीएमएवाय अंतर्गत कामांच्या तरतुदीमद्धे वाढ घट करण्यास महापालिका सभेच्या प्राप्त अधिकारांतर्गत प्रशासक यांची मान्यता घेणेकामी शिफारस करणे, निवडणूक विभागातील निवडणूक व जनगणना विषयक कामकाजाकरीता मानधानावर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांस नियुक्ती किंवा मुदतवाढ देणे, फुगेवाडी येथील स्मशानभूमी व दफनभूमी कडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे लाईन व ३० मी एचसीएमटीआर खालून भुयारी मार्ग बांधणे, महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील किरकोळ दुरुस्ती व देखभाल भाग २ अंतर्गत कामांच्या तरतुदीमध्ये वाढ घट करणे, निवडणूक विभाग व थेरगाव रुग्णालयाकरिता आवश्यक साहित्य खरेदी करणे, आंद्रा व भामा आसखेड,पाणीपुरवठा योजनेसाठीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करण्यात आलेल्या सल्लागाराच्या कामाच्या वाढीव रक्कम, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील क्ष किरण विभागास आवश्यक सी.आर सिस्टीम मशीनची बिल अदायगीस कार्योत्तर मान्यता देणे आदी विषयांना आयुक्त हर्डीकर यांनी मान्यता दिली.













