- १८ वर्षांचा यशस्वी प्रवास; हजारो विद्यार्थ्यांना मिळाली आंतरराष्ट्रीय संधी..
- विभागप्रमुख अमोल भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त आयआयबीएम परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय घेऊन स्थापन झालेले आयआयबीएम कॉलेज, चिखली (पुणे) आज हॉस्पिटॅलिटी, एअरलाइन्स, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आले आहे. संस्थेने केवळ शिक्षणच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर भर देत देश-विदेशातील हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडवले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर सर यांच्या दूरदृष्टीतून “कमवा आणि शिका” या अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. ग्रामीण आणि निम्न आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळावी, या उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या माध्यमातून शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते.
आज आयआयबीएमचे विद्यार्थी ताज, मेरिडियन, ओबेरॉय, हयात यांसारख्या नामांकित पाचतारांकित हॉटेल्समध्ये तसेच क्रूझ शिप्स, आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स आणि टुरिझम सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग मॉडेलमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर व्यावसायिक कौशल्यांमध्येही प्रावीण्य मिळाले आहे.
या संस्थेच्या प्रगतीत विभागप्रमुख अमोल भागवत सरांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. मागील १४ वर्षांपासून ते HOD (Hospitality Department) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक नवे अभ्यासक्रम सुरू केले, डिजिटल शिक्षण पद्धतींचा अवलंब केला तसेच स्टुडंट डेवलपमेंट प्रोग्राम्स, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स यांसारख्या उपक्रमांना चालना दिली.
भागवत सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी “विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धत” अवलंबली असून, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणवत्तेचा विकास आणि रोजगाराभिमुख तयारी हा त्यांच्या अध्यापनाचा गाभा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी झाला आहे.
८ नोव्हेंबर हा अमोल भागवत सरांचा जन्मदिन असून, विद्यार्थ्यांमध्ये ते प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि मित्रत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयआयबीएम परिवाराने ‘यशस्वी शिक्षक – प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ म्हणून त्यांचा सन्मान केला.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर सर, प्राचार्य प्रदीप फुलकर सर, प्रशासकीय विभाग प्रमुख प्रतीक्षा डफळ मॅडम, विभाग प्रमुख अनिकेत वंजारी सर, संदीप जाधव सर, तसेच सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांनी “विद्यार्थ्यांच्या यशातच आमचे खरे यश आहे” या भागवत सरांच्या विचाराशी एकरूप होत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन मान्यताप्राप्त असलेले आयआयबीएम कॉलेज आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्याचे केंद्रबिंदू बनले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा मिळत आहे.













