- भेळ चौक व आकुर्डी रेल्वेस्टेशन परिसरातील भूखंड घेणार ताब्यात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
प्राधिकरण, शनिवार (दि. २७ सप्टेंबर २०२५) :- प्राधिकरण परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात गंभीर पार्किंग समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भेळ चौक व आकुर्डी रेल्वेस्टेशनसमोरील महत्त्वाच्या भूखंडांवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावास आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली असून, लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
एनपीआरएफ फाउंडेशनच्या वतीने पालिका आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी महापौर आर. एस. कुमार, सामाजिक कार्यकर्ते नीलेश शिंदे, अतुल भोंडवे, विजयकुमार नाईक, सचिन बनसोडे, अमोल भोईटे, प्रशांत साबळे, धनंजय कदम, अश्विन खरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत पार्किंगची कमतरता ही मोठी समस्या ठरत आहे. विशेषतः रेल्वेस्टेशन परिसरात अव्यवस्थितरीत्या पार्क झालेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. बहुमजली वाहनतळ उभारल्यास शेकडो वाहनांना सुरक्षित जागा मिळणार असून, वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरेल, असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.












