न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२५) :- पिंपरीतील वाल्मिकीनगर परिसरात किरकोळ भांडणाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता वाल्मीकी चौकाजवळील भाजणी मंडई पार्किंग परिसरात ही घटना घडली. जुन्या वादाच्या कारणावरून एकूण १२ जणांनी मिळून दांडीया पाहण्यासाठी आलेल्या १६ वर्षीय तरुणाला अडवून लाथा-बुक्क्यांनी व धारदार शस्त्रांनी मारहाण केली.
“तुला आज सोडणार नाही, जीव घेऊन टाकू” अशा धमक्या देत आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी १) नरजीम शेख वय अंदाजे १८ वर्ष रा.एमआयडीसी पिंपरी पुणे, २) विशाल गालफाडे वय अंदाजे २० वर्ष, रा. बौध्दनगर पिंपरी पणे, ३) यश गायकवाड वय अंदाजे १८ वर्ष, रा. काळेवाडी पुणे, ४) सिध्दार्थ गालफाडे वय अंदाजे १८ वर्ष, रा. बौध्दनगर पिंपरी पुणे, ५) यश रोकडे वय अंदाजे १८ वर्ष, रा. एमआयडीसी पिंपरी पुणे, विधीसंघर्षित बालक-६, रा. एमआयडीसी पिंपरी पुणे व त्यांचे सोबत आणखीन १२ ते १३ जणांविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोळा वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












