न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- निगडी उड्डाण पुलाखाली जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कोहिनूर आर्केड परिसरात शुक्रवारी दुपारी पीएमपीच्या वातानुकूलित बसला अचानक आग लागल्याची घटना घडली.
निगडीहून पुढे जात असताना बसच्या इंजिन भागातून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ बस थांबवत प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. काही क्षणांतच बसच्या मागील बाजूस लागली.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.