- नगरपंचायतीच्या विशेष सभेत विविध विकासात्मक निर्णयांना मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू, (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- देहू नगरपंचायतीने आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीसाठी दोन खाजगी जागा आणि शासकीय गायरान जमिनीवर स्टॉलसाठी जागा निश्चित केल्या आहेत. खाजगी जागा मालकांच्या संमतीशिवाय आणि वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या ठिकाणी कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. परवानगी मिळालेल्या स्टॉलधारकांकडून प्रति स्टॉल ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नगरपंचायतीकडून देण्यात आले आहेत.
नगरपंचायतीच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष प्रियंका मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मुख्याधिकारी चेतन कोंडे तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
या बैठकीत “माझी वसुंधरा” आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत नव्याने नियुक्त झालेल्या शहर समन्वयक शितल शेळके यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेत पीएमआरडीएला सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणे, नवीन भुयारी गटारी योजना राबविणे, तसेच मुख्यकमान ते १४ टाळकरी कमान रस्त्यावर नो हॉकर्स क्षेत्र घोषित करणे यासह महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिलांसाठी फॅब्रिक पेंटिंग, मॅट रांगोळी, डिझायनर कॅन्डल आणि सुगंधित उटणे तयार करण्याच्या प्रशिक्षणास मंजूरी दिली.