न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन, पुणे (दि. १० ऑक्टोबर २०२५) :- सार्वजनिक ठिकाणी परवानगी न घेता जाहिरातीचे फलक लावल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी तीन इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही जणांनी विविध ठिकाणी जाहिरात फलक लावून शहराचे विद्रुपिकरण केल्याची तक्रार महापालिकेच्या परवाना निरीक्षक निलेश घोलप यांनी केली आहे.
७ ऑक्टोबर २०२५ रोजी बावधन परिसरात एन.डी.ए. पाषाण रोडवरील बावधन पोलिस चौकीसमोर “सराफ सुप्रिमस”, लेन नं. ४, सर्वे नं. १९/१२ब/१ येथे “आरपीसी इंटरप्रायजेस पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस” आणि त्याच परिसरात “एम.व्ही.पी. म्युझिक फेस्टिव्हल” असे तीन वेगवेगळे जाहिरात फलक लावण्यात आले होते.
या फलकांसाठी कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी जाहिरात लावल्याने परिसराचे सौंदर्य बिघडले आणि शहराचे विद्रुपिकरण झाले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि फड करत आहेत.