- २५ जागांसाठी तब्बल साडेआठशेहून अधिक अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बिजलीनगर (दि. ११ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापारेषणच्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित) कार्यकारी अभियंता, बिजलीनगर शाखेत दहावी-आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटीस भरती प्रक्रियेबाबत तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. एकूण २५ जागांसाठी तब्बल साडेआठशेहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.
दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीसाठी आज शनिवार (दि. ११) रोजी महापारेषणच्या कार्यालयीन आवारात मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित होते.
अनेक उमेदवार हे केवळ पुणे जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या विविध भागांतून भरतीसाठी आले होते. पडताळणीच्या ठिकाणी सकाळपासूनच तरुणांची गर्दी पाहायला मिळाली. त्यांच्या व्यवस्थेची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
दिल्लीस्थीत (NAPS) विभागाकडे शिकाऊ (Apprenticeship) उमेदवारीसाठी अर्ज करण्यात येतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया राबवली जाते. या वर्षी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. आज प्रत्यक्ष अर्ज पडताळणीचा शेवटचा दिवस होता. उमेदवारांची निवड पूर्णपणे मेरिटनुसार केली जाणार आहे. निवड प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त करण्यात येईल. – दीपक मदने, कार्यकारी अभियंता – अ उ दा सं व सु विभाग, पिंपरी चिंचवड कार्यालय…