- मरकळमध्ये दलित कुटुंबावर स्थानिकांची दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मरकळ, खेड (दि. 16 ऑक्टोबर 2025) :- मरकळ (ता. खेड) येथील शेतजमिनीच्या वादातून महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि धमकी देण्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तेजस राजाराम लोखंडे (वय ३०) आणि प्रसाद हनुमंत लोखंडे (वय २८, दोघे रा. बाजारे वस्ती, मरकळ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी महिला शेतात काम करत असताना आरोपींनी “ जातीवाचक वक्तव्य करून, इकडे कशाला आलात” असे म्हणत जातीवरून शिवीगाळ केली. आरोपींनी साडीचा पदर ओढून फाडला, तसेच लाकडाने मारहाण करून पतीचा हात फॅक्चर केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या अल्पवयीन मुलीला देखील गळा पकडून जमिनीवर ढकलत अत्यंत अमानुष वर्तन केले. शेवटी, “पोलीस ठाण्यात तक्रार केली तर मुलींना नागडे करेन” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणाचा तपास सपोआ सचिन कदम, चाकण विभाग, करत आहेत.













