- आयटीडीआरमध्ये ३३ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- “रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वतःचीच नव्हे तर इतरांचीही सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन वाहनचालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे (आयटीडीआर) प्राचार्य संजय ससाणे यांनी केले.
कासारवाडी येथील आयटीडीआरमध्ये नुकतेच ३३ प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभात सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी राणु कुलक्षेष्ठा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर शेफाली रॉय (ब्रिस्टॉन सीआरएस), सुधीर कुलकर्णी, सैफुल हक, आणि अनिता लंताबरे यांनी उपस्थिती दर्शविली.
या प्रशिक्षणात ठाणे, भंडारा, जळगाव, गोंदिया, सातारा, धुळे आणि अहिल्यानगर येथून विद्यार्थी सहभागी झाले होते. ३० दिवसांच्या अभ्यासक्रमात त्यांनी वाहतूक नियम, वाहन तांत्रिक माहिती आणि सुरक्षित वाहनचालनाचे कौशल्य आत्मसात केले. प्राचार्य ससाणे यांनी प्रशिक्षणार्थींना नोकरी आणि व्यवसायातील संधींचीही माहिती दिली.