- या तारखेपर्यंत होणार ऑनलाईन अर्ज स्वीकृती; राज्यभर एकाच दिवशी परीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, ३१ ऑक्टोबर २०२५ :- पिंपरी-चिंचवड पोलिस दलात एकूण ३२२ पोलिस शिपाई पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत स्वीकारले जातील. भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या भरतीत सर्वसाधारण उमेदवारांसाठी ९७ पदे, महिला ९७, खेळाडू १६, प्रकल्पग्रस्त १६, भूकंपग्रस्त ६, माजी सैनिक ४८, अंशकालीन पदवीधर १६, पोलिस पाल्य १०, गृहरक्षक दल १६ आणि अनाथांसाठी ३ पदे राखीव आहेत.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा होईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. शारीरिक व लेखी चाचणीतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्जासाठी उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. भरती प्रक्रियेत पैशांची किंवा इतर स्वरूपातील मागणी केल्यास उमेदवारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त (अतिरिक्त कार्यभार) तथा भरती समितीच्या अध्यक्ष श्वेता खेडकर यांनी केले आहे.












