- प्रियकराचा मोबाइल फोन जप्त करण्यात अद्यापही पोलिसांना अपयश?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :-चिंचवडमधील नकुल आनंदा भोईर खूनप्रकरणातील दोन्ही संशयितांची पोलिस कोठडी आणखी एका दिवसाने वाढवण्यात आली आहे. संशयित सिद्धार्थ पवारचा मोबाइल फोन अद्याप सापडलेला नसल्याने तो हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात कोठडीवाढीची मागणी केली होती.
२४ ऑक्टोबर रोजी माणिक कॉलनी येथे झालेल्या या हत्येत नकुल याची पत्नी चैताली नकुल भोईर (२८) आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (२१) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी संगनमत करून नकुलचा खून केला होता.
शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी सिद्धार्थचा मोबाइल फोन अत्यंत महत्त्वाचा असून, त्यातून गुन्ह्याशी संबंधित पुरावे मिळू शकतात, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत दोन्ही संशयितांची कोठडी रविवारपर्यंत (दि. २ नोव्हेंबर) वाढवली आहे.












