- प्रशासकीय काळातील खर्चामुळे ठेवी मोडल्याचा विरोधकांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेवीत तब्बल ८६६ कोटी ६६ लाख रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये एकूण ४ हजार ६६५ कोटी २८ लाख रुपये इतका निधी जमा असून, त्यात व्याजासह २९४ कोटी ९९ लाख रुपयांचा समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे, प्रकल्प आणि विविध खर्चिक उपक्रमांमुळे या ठेवी मोडल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात अनावश्यक खर्चाला प्राधान्य देण्यात आल्याने महापालिका आर्थिकदृष्ट्या दबावाखाली आली आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
दरम्यान, महापालिकेच्या लेखा विभागाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात ठेवी ५ हजार ६३३ कोटी ४४ लाख होत्या, तर २०२५-२६ मध्ये ती रक्कम घटली आहे. मात्र, महापालिकेचे वित्त संचालक प्रविण जैन यांनी ठेवी सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
“महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम असून, संस्थेचे पतमानांकन ‘AA+ स्टेबल’ आहे.” – प्रविण जैन, संचालक (वित्त विभाग, मनपा…)












