- पिंपरी चिंचवड आरटीओची ऑनलाइन सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वाहतूक नियमभंगासाठी होणाऱ्या दंड भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक केली आहे. नागरिकांना आता तपासणी अहवालांवरील समझोता शुल्क आणि दंडाची रक्कम थेट ऑनलाइन भरता येणार आहे.
परिवहन आयुक्तालयाच्या सूचनेनुसार, पिंपरी चिंचवड परिसरात नऊ रोड सेफ्टी पथके कार्यरत असून, ही पथके नियमित वाहन तपासणी करून नियमांचे पालन सुनिश्चित करतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत नियमभंग झाल्यास संबंधित वाहनचालक https://echallan.parivahan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून दंड भरू शकतात. तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन पेमेंट न झाल्यास किंवा प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास, नागरिकांनी आरटीओच्या खटला विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“ऑनलाइन प्रणालीचा वापर वाढविल्यास वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल,”
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी…












