- १३ देशांतील २०० खेळाडूंचा सहभाग; ४ नोव्हेंबरपर्यंत रंगणार स्पर्धा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आयएफएससी आशियाई स्पोर्ट क्लाइंबिंग अजिंक्यपद स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळाल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. “महाराष्ट्रात प्रथमच अशी स्पर्धा होत आहे, आणि महापालिका या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग असल्याचा अभिमान आहे,” असे ते उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
पिंपळे सौदागर येथील योगा उद्यानातील पीसीएमसी क्लाइंबिंग वॉल येथे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होत असून, १३ देशांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे आयोजन इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन, महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लीड, स्पीड आणि बोल्डर प्रकारच्या क्लाइंबिंग वॉल्स येथे बांधण्यात आल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यात देश-विदेशातील मान्यवर, नागरिक आणि खेळाडूंची मोठी उपस्थिती होती. पारंपरिक स्वागतगीत, कथक नृत्य आणि ढोल-ताशांच्या गजरात सोहळा जल्लोषात पार पडला












