न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- कासारसाई (ता. मुळशी, जि. पुणे) येथे जमीन विक्रीच्या व्यवहारात तब्बल १ कोटी ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी परवेज मकबुल इनामदार-मुलाणी (३३, रा. दापोडी, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय कृष्णा वाडकर (पत्ता अज्ञात) याने त्यांच्या व त्यांच्या भावाच्या मालकीच्या जमिनीपैकी ०० हे. ४० आर क्षेत्र विक्री करण्याचे सांगून त्यांच्याकडून १.८६ कोटी रुपये घेतले. मात्र, संबंधित जमीन त्यांच्या नावावर न करता ती इतरांना विकली.
या प्रकाराने फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपी अद्याप फरार असून, पुढील तपास सपोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












