- पिंपरी चिंचवड महापालिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- देहू-देहूरोड पालखी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत असून, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि खराब डांबरीकरणामुळे नागरिक व यात्रेकरूंना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शेलारवाडी-देहू-आळंदी हा राज्य मार्गाचा भाग असला, तरी हा रस्ता कोणत्याही स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत नाही, ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणामुळे रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण आणि बाजू पट्टधांचे काम महिन्यांपासून प्रलंबित आहे.
श्रीक्षेत्र देहू-देहूरोड पंचक्रोशी समितीने या समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. त्यावर ९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक कारवाईचे निर्देश दिले. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाल्याने कार्यवाही ठप्प झाली आहे. दरवर्षी यात्रेआधी रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले जाते, पण कामे न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.













