न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीमधील औद्योगिक प्रकल्पांना मूळ पायाभूत सुविधा पुरविणे, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे, अग्रिशमन ना हरकत दाखला व प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार विकास परवानगीसाठी बीपीएमएस (BPMS) संगणक प्रणाली राबविताना अडचणी येत असल्याने प्रकल्पाच्या विकसनास विलंब होत असल्याचे पुढे येत आहे.
त्यामुळे चाकण, रांजणगाव, हिंजवडी, तळेगाव, पिरंगुट आदी भागातील औद्योगिक असोशिएशनच्या सदस्यांसोबत त्याच्या समस्या जाणून घेऊन प्राधिकरणाच्या हाती घेतलेल्या शहर स्तरीय प्रकल्पांविषयी माहिती देणे, बीपीएमएस प्रणालीबाबत कार्यशाळा घेऊन संबंधित औद्योगिक असोशिएशन यांच्या अडचणीचे निरसन करण्यासाठी शुक्रवारी (दि.७) आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
यास संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.












