- पक्षांतर्गत तणाव वाढण्याची शक्यता?..
- खुल्या गटातील इच्छुकांमध्ये अनिश्चिततेचे सावट?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीने शहराच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ घडवली आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांसाठी राखीव झालेल्या जागांमुळे अनेक दिग्गजांचे ‘गड’ उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांना नव्या प्रभागातून उमेदवारी शोधावी लागणार असून राजकीय पातळीवर नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरवेळेप्रमाणे यंदाही काही प्रभागांतील आरक्षण बदलल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या आकांक्षांवर पाणी फिरले आहे. मागील निवडणुकीत खुले असलेले काही प्रभाग यावेळी आरक्षित झाल्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट) आणि शिवसेना (शिंदे व ठाकरे गट) या सर्व पक्षांनी नव्या उमेदवारांची गणिते मांडायला सुरुवात केली आहे.
प्रभाग ३० पूर्णपणे आरक्षित झाल्याने खुल्या गटातील उमेदवारांची कोंडी झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, तसेच माजी नगरसेवक राहुल भोसले आणि राहुल कलाटे यांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत.
अनुसूचित जाती आरक्षणामुळे विकास डोळस, शैलेश मोरे, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे आणि संतोष कांबळे यांना पुनर्निवडीची संधी गमवावी लागली आहे. तर एससी महिला आरक्षणामुळे अनुराधा गोरखे, निकिता कदम आणि मनीषा पवार यांच्या जागा सुरक्षित झाल्या आहेत.
भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे आणि उद्धवसेनेचे माजी नगरसेवक सचिन भोसले यांनाही आरक्षण बदलामुळे धक्का बसला आहे. ओबीसी आरक्षणात झालेल्या फेरबदलामुळे माजी महापौर मंगला कदम, चंद्रकांता सोनकांबळे आणि यशोदा बोईनवाड यांसारख्या दिग्गज महिलांनाही खुल्या गटात उतरावे लागणार आहे.
काही प्रभागांत इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत संघर्ष अटळ दिसतो आहे. उमेदवारी वाटपाच्या टप्प्यावर नाराजी आणि असंतोषाचे वारे वाहण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे पुन्हा आखली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
यांच्या गटातील आरक्षणात बदल…
कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, विकास डोळस, निर्मला जगताप, सागर गवळी, अनुराधा गोफणे, सारिका लांडगे, रवी लांडगे, सीमा साळवे, गीता मंचरकर, राहुल भोसले, केशव घोळवे, मंगला कदम, अश्विनी बोबडे, संजय नेवाळे, पौर्णिमा सोनवणे, कमल घोलप, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, माधुरी कुलकर्णी, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, शैलेश मोरे, कोमल मेवानी, सुलक्षणा धर, शाम लांडे, विनोद नढे, उषा काळे, अभिषेक बारणे, अॅड. सचिन भोसले, झामाबाई बारणे, अश्विनी वाघमारे, राहुल कलाटे, ममता गायकवाड, तुषार कामठे, सागर आंगोळकर, चंदा लोखंडे, आशा शेंडगे, स्वाती काटे, रोहित काटे, अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे.
यांच्या गटातील आरक्षण जैसे थे…
साधना मळेकर, अश्विनी जाधव, सरिता बोऱ्हाडे, राहुल जाधव, वसंत बोराटे, विनया तापकीर, लक्ष्मण सस्ते, नानी घुले, प्रियंका बारसे, अजित गव्हाणे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, प्रा. सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, अॅड. नितीन लांडगे, नम्रता लोंढे, विक्रांत लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, अनुराधा गोरखे, तुषार हिंगे, योगिता नागरगोजे, एकनाथ पवार, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, पंकज भालेकर, सुमन पवळे, सचिन चिखले, मीनल यादव, वैशाली काळभोर, प्रमोद कुटे, राजू मिसाळ, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, मोरेश्वर भोंडवे, करुणा चिंचवडे, सचिन चिंचवडे, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे, जयश्री गावडे, शीतल शिंदे, सुजाता पालांडे, योगेश बहल, निकिता कदम, संदीप वाघेरे, उषा वाघेरे, डब्बू आसवानी, नीता पाडाळे, संतोष कोकणे, मनीषा पवार, कैलास बारणे, माया बारणे, नीलेश बारणे, रेखा दर्शले, मयूर कलाटे, आरती चोंधे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, सुनीता तापकीर, चंद्रकांत बारणे, शत्रुघ्न काटे, निर्मला काटे, शीतल काटे, नाना काटे, उषा मुंढे, शशिकांत कदम, राजू बनसोडे, सीमा चौगुले, नवनाथ जगताप, उषा ढोरे, हर्षल ढोरे या माजी नगरसेवकांचा प्रभाग पूर्वीप्रमाणेच राहिल्याने या प्रभागातील माजी नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.












