- रोहिणीताई रासकर यांच्या महिला कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड(दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न झाली असून, प्रभाग क्रमांक १० हा ओबीसी महिलांसाठी राखीव ठरला आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला मोर्चात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रोहिनीताई रासकर यांच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रभागामध्ये एकमेकींना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सविता निकाळजे, रेश्मा भीमा कुराडे, छाया रवी बनसोडे, समिना जावेद पठाण, ममता खूशवाह,मायावती मोतिरावे ,सरिता खुशवाह,हीना शेख, सुजाता साखरे, पुष्पा बाबर,शांताबाई गायकवाड, अनिता यादव,सुनीता भालेराव,मनीषा बाराई, शोभा गायकवाड, गंगुबाई दोडमानी, ऋतुजा बल्लाळ,सुजाता ढेंडे, इंदुबाई ओव्हाळ,अरुणा कांबळे, शमिका मोरे,रेश्मा सूर्यवंशी, समानी अब्दुलमतीन,मुमताज शेख,यश्मिन कुरेशी,बेनू यादव,दिपाली केंगारे, रिता कुशावाह ,पूजा यादव, बेनु यादव लीला कुशवाह, रीता कुशवाह आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
रोहिणीताई नेहमी सर्वसामान्य महिलांच्या समस्यांसाठी तत्पर असतात. समाजातील वंचित घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. महिलांच्या सर्व अडीअडचणीत 24 तास उभ्या असलेल्या रोहिणी ताई त्यांचे नेतृत्व म्हणजे प्रेरणादायी शक्ती आहे महिलांसाठी. त्या संघटनशक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण आहेत. महिलांसाठी गरजूंसाठी त्यांनी उभारलेला संघर्ष आणि विकासाच्या दृष्टीने केलेले कार्य आज सर्वांसाठी आदर्श आहे.प्रभाग १० मध्ये ओबीसी महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याने प्रभागातील विकासाला चालना मिळेल आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्मविश्वासाने पुढे जात आहोत अशा भावना महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त करून परस्परांचे अभिनंदन करत आगामी निवडणुकीसाठी जोमाने तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला.












