- परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक १३९…
- महाळुंगे, चाकण, तळेगाव दाभाडे आघाडीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, केवळ १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत एकूण २३२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
या कालावधीत सर्वाधिक कारवाया परिमंडळ ३ मध्ये झाल्या असून त्यांची संख्या तब्बल १२९ आहे. त्यानंतर परिमंडळ १ मध्ये ५४, तर परिमंडळ २ मध्ये ४९ कारवाया झाल्या आहेत.
या मोहिमेत महाळुंगे (१८), चाकण (८९) आणि तळेगाव दाभाडे (१७) या ठिकाणी सर्वाधिक कारवाया झाल्या असून, या भागांतील पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने सर्व परिमंडळांमध्ये स्वतंत्र पथके कार्यरत ठेवली असून, अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
परिमंडळनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे…
परिमंडळ १ : संत तुकारामनगर (७), भोसरी (११), रावेत (५), चिंचवड (४), दापोडी (२), निगडी (१), पिंपरी (१३), सांगवी (११) — एकूण ५४
परिमंडळ २ : काळेवाडी (४), बावधन (४), देहूरोड (६), हिंजवडी (०), शिरगाव (८), तळेगाव दाभाडे (१७), तळेगाव एमआयडीसी (३), वाकड (७) — एकूण ४९
परिमंडळ ३ : चिखली (८), महाळुंगे (१८), आळंदी (३), चाकण (८९), भोसरी एमआयडीसी (६), दिघी (५) — एकूण १२९











