- बनावट कागदपत्रे तयार करून खोटे आरोग्य दावे दाखल करणाऱ्या दोघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. १८ नोव्हेंबर २०२५) :- तळेगाव दाभाडे येथे तब्बल २२,९६,०३५ रुपयांची विमा फसवणूक प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ मार्च २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तळेगाव येथे घडलेल्या या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार टाटा एआयजी कंपनीचे सीनियर मॅनेजर डॉ. संदीप गायकवाड (वय ३६) यांनी दिली.
तक्रारीनुसार, आरोपी १) डॉ. संदीप वानखेडे (वय ४०),
२) डॉ. विशाल ककडे (वय ४०) यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीकडे वेगवेगळ्या रुग्णांच्या नावाने खोटे आरोग्य विमा दावे दाखल केले.
या दाव्यांची रक्कम हॉस्पिटलच्या नावाने बँक, खात्यात जमा झाली. ऑनलाईन पद्धतीने एकूण २२.९६ लाख रुपये स्वीकारून विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोउपनि खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.











