- एमएसएमई क्षेत्रातील आव्हानं आणि कृतीशील उपायांवर उहापोह..
- पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे लघुउद्योजकांना उपस्थित राहण्याचं आवाहन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व लघुउद्योजकांनी आगामी “एमएसएमई विभागीय परिषदेस” मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे करण्यात आले आहे. भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या खर्च व स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी केंद्र शासनाने ‘एमएसएमई संवाद’ हा देशव्यापी उपक्रम हाती घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून ही परिषद पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
एमएसएमई–डीएफओ मुंबईच्या वतीने आयोजित या परिषदेचा उद्देश—एमएसएमईसमोरील आव्हानांची ओळख, खर्च नियंत्रण, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कृतीशील शिफारसी तयार करणे हा आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील ७५ क्लस्टर कार्यशाळांमधून ६,७०० हून अधिक उद्योजकांचा अभिप्राय गोळा करण्यात आला. महाराष्ट्रात नागपूर, पुणे व कोल्हापूर येथे कार्यशाळा घेण्यात आल्या असून त्यातून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ११ विभागीय परिषदांपैकी महाराष्ट्राची परिषद ८ डिसेंबर रोजी पुण्यात पार पडणार आहे. येथील निष्कर्ष नवी दिल्लीतील राष्ट्रीय शिखर परिषदेसाठी आधार ठरणार असून, ती माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
लघुउद्योजकांनी सक्रिय सहभाग नोंदवल्यास, त्यांच्या मौल्यवान सूचना धोरणात्मक पातळीवर मांडता येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सचिव जयंंत कड यांनी सांगितले. परिषदेला अर्थपूर्ण व्यासपीठ बनवण्यासाठी उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
परिषदेचे ठिकाण :- क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, प्लॉट नं. जे/पी-10, निगडी–भोसरी रोड, जे ब्लॉक MIDC, भोसरी, पुणे-411026
दिनांक : 08 डिसेंबर 2025/ वेळ : सकाळी 10.00
संपर्क :
1. श्री N. N. इस्तोलकर – 9768686250
2. श्री अभय दप्तदार – 9619927453
















