- एकूण 124 कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. 07 डिसेंबर 2025) :- तेजग्यान फाउंडेशन, पुणे ही संस्था गेली 25 वर्षे अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून अध्यात्माचे ज्ञान विशिष्ट प्रणालीने देण्यासाठी ISO 9001-2015 प्रमाणपत्र प्राप्त करणारी जगातील पहिली अध्यात्मिक संस्था आहे. संस्थेचे ब्रीदवाक्य Happy Thoughts असून मानवाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक या सर्व स्तरांवर उन्नती साधण्यासाठी संस्था कार्य करते. उच्चतम विकसित समाज घडवणे हे संस्थेचे ध्येय आहे.
संस्थेतील प्रमुख शिबिरांपैकी एक म्हणजे महाआसमानी परमज्ञान शिबिर पाच दिवसीय निवासी शिबिर, जे सिंहगड येथील मनन आश्रमात आयोजित केले जाते. आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक लोकांनी हे शिबिर पूर्ण केले आहे. शिबिरानंतर संपूर्ण भारतात तसेच काही परदेशातील केंद्रांवर दर आठवड्याला श्रवण आयोजित केले जाते, ज्यामुळे सहभागी पाचही स्तरांवर सातत्याने प्रगती करू शकतात.
तेजज्ञान फाउंडेशन नेहमीच विविध माध्यमांतून अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्याचाच भाग म्हणून, ज्यांना पाच दिवस सलग देणे शक्य नाही, अशांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत:
एक दिवसीय संपूर्ण लक्ष्य आणि बुनियादी सत्य शिबिर. दोन तासांचे चार स्वतंत्र सेशन आयोजित केले जातात. ही तीन पायरीची तयारी पूर्ण केल्यानंतर सहभागीला महाआसमानी शिबिराच्या तिसऱ्या दिवशी थेट प्रवेश मिळतो व फक्त तीन दिवसांत (शुक्रवार–रविवार) संपूर्ण शिबिर पूर्ण करता येते.
याच उपक्रमांतर्गत, प्रथमच चाकण MIDC उद्योजक संघटनेने पुढाकार घेऊन वेल्डर, हेल्पर, फिटर, ग्राइंडरमन अशा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर असलेल्या कामगारांसाठी एक दिवसीय संपूर्ण लक्ष्य शिबिर आयोजित केले. या शिबिरात दहा–बारा कंपन्यांमधील 125 पेक्षा अधिक कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी अमेया इंडस्ट्रीज युनिट–2 ची जागा उद्योजक किसन गायकवाड यांनी उपलब्ध करून दिली. शिबिराचे मार्गदर्शन तेजग्यान फाउंडेशनचे सत्याचारी रवींद्र शेंडे सर व कल्पना मॅडम तसेच तेजसेवक संतोष कोल्हे, अपेक्षा पवार, उदय पोतादार, रणजित चौल, चेतन जंगम, शीतल वऱ्हाडे, शंकर शिवशेट्टी, शकील मुलाणी, गोविंद इंगोले, जयदेव अक्कलकोटे, प्रशांत गोरे, किसन गायकवाड हंडीबाग यांनी ऊत्तम सेवा दिली.
कार्यक्रमातील मंडप व्यवस्था, ध्वनी प्रणाली, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांची संपूर्ण जबाबदारी चाकण MIDC उद्योजक संघटनेने उत्कृष्टरीत्या पार पाडली.
या उपक्रमासाठी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री जयदेव अक्कलकोटे, खजिनदार किसन गायकवाड,संचालक प्रशांत गोरे, संचालक श्रीराम हंडीबाग यांचे विशेष सहकार्य लाभले.















