- प्रभाग क्रमांक २७ मधील लाडक्या बहिणींसाठी मनोरंजन, स्पर्धा आणि बक्षिसांची मेजवानी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि.१३ डिसेंबर २०२५) :- सागर खंडुशेठ कोकणे युवा मंचच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मधील खास लाडक्या बहिणींसाठी महिलांचा आवडता ‘खेळ रंगला पैठणीचा – न्यू होम मिनिस्टर’ हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांसाठी गप्पागोष्टी, मनोरंजनात्मक खेळ, बहारदार सादरीकरणे आणि आकर्षक बक्षिसांचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे सादरीकरण प्रसिद्ध अभिनेते रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडीच्या करामती फेम) करणार असून त्यांच्या विनोदी शैलीमुळे कार्यक्रमात रंगत वाढणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी होंडा अॅक्टीव्हा व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी ४३ इंची टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी फ्रीज, चतुर्थ क्रमांकासाठी वॉशिंग मशिन तर पाचव्या क्रमांकासाठी मायक्रो ओव्हन अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महालकी ड्रॉमध्ये ५० महिलांना पैठणी, प्रश्नमंजुषा अंतर्गत ५० महिलांना पैठणी तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धक महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कापसे लॉन्स, रहाटणी येथे होणार आहे. फॉर्म जमा करण्यासाठी सागरभाऊ कोकणे जनसंपर्क कार्यालय, विमल गार्डन समोर, गोडांबे चौक, रहाटणी येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी सागर खंडुशेठ कोकणे यांनी प्रभागातील सर्व लाडक्या बहिणींना आवाहन केले असून, “हा कार्यक्रम महिलांसाठी आनंद, सन्मान आणि मनोरंजनाचा उत्सव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी साधावी,” असे आवाहन त्यांनी केले आहे.


















