- पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवडमध्ये ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.१३ डिसेंबर २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महानगराच्या विकासाला ऐतिहासिक गती देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएच्या मालकीचे असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील विविध उपयोगांचे एकूण ३० भूखंड प्रथमच ८० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर ऑनलाइन ई-लिलाव पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भूखंडांमध्ये तीन शैक्षणिक वापराचे भूखंड, नऊ वाणिज्य व सार्वजनिक सुविधा भूखंड, एक वैद्यकीय वापराचा भूखंड, एक सार्वजनिक सुविधा (लायब्ररी/संगीत शाळा) भूखंड आणि एक फॅसिलिटी सेंटर भूखंड यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे ग्रामीण हद्दीतील १४ सुविधा भूखंड (Amenity Space) तसेच भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील एक वाणिज्य भूखंडदेखील या ई-लिलावाचा भाग आहेत. या भूखंडांचे वाटप पात्र आणि इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांना ई-लिलावाद्वारे केले जाणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती https://eauction.gov.in आणि पीएमआरडीएचे अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे महानगराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख तारखा आणि प्रक्रिया:
1.नोंदणी व कागदपत्रे डाऊनलोड करण्याची मुदत: दि. १५ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १३ जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
2.तांत्रिक बोलीदारांची घोषणा: तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या बोलीदारांची घोषणा दि. २२ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल.
3.लाईव्ह ई-लिलाव (Live Auction): अंतिम ई-लिलाव प्रक्रिया दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होईल.
मा. संपादक,
कृपया उपरोक्त वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, वृत्तवाहिनी, डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धीस द्यावे, ही विनंती.
पुरूषोत्तम सांगळे
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
8087861982


















