
- ‘केवळ भाषण नव्हे तर, प्रत्यक्ष कामातून समाधान देण्याचा निर्धार’..
- BE IT इंजिनिअर भैय्या हरिश्चंद्र गायकवाड यांच प्रस्थापितांसमोर आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मधून प्रथमच अत्यंत उच्चशिक्षित आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला आहे. BE IT इंजिनिअर असलेले भैय्या हरिश्चंद्र गायकवाड यांनी “नुसती भाषणे नाहीत, तर प्रत्यक्ष कामातूनच नागरिकांना समाधान देणार,” असा ठाम संकल्प व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २७ मध्ये विविध सामाजिक आणि लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले असून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, या शिबिराला नागरिकांकडून विशेषतः तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासोबतच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये गरजू नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. लहान मुलांसाठी अन्नदान करण्यात आले तसेच बालकांसाठी चित्रकला (पेंटिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, चंद्रकांत तापकीर, अश्विनी तापकीर, युवा नेते ऋषिकेश नखाते, आशितोष नखाते, लखन नखाते, युवा नेते तुकाराम शिंदे, आकाश पवार, सुमित डोळस, प्रल्हाद भाकरे, दत्तात्रय मिडमुळे, विठ्ठल वरपे, किरण गडदे, शरद मिडगुळे, अक्षय ढोबळे, अक्षय गायकवाड, ओंकार तळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसेच प्रभागातील श्री राजे मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ आणि बोधिसत्व प्रतिस्तनच्या सर्व सभासदांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. या उपक्रमांच्या माध्यमातून भैय्या हरिश्चंद्र गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिक्षित, संवेदनशील आणि लोकाभिमुख नेतृत्व उभे राहत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.


















