न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि. १३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास एकनाथ नांदगुडे यांनी नांदगुडे पाटील फाउंडेशनच्या वतीने लक्ष्मीबाई नांदगुडे चषक २०२५, प्रभाग क्रमांक २६ मधील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा कै. गणेश कदम क्रीडागण, सर्वे नं ६२, सुलोचना सिटी जवळ ,पिंपळे निलख येथे मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल डे नाइट भव्य अशा क्रिकेट स्पर्धा दि १४ ते २१ डिसेंबर २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या मध्ये विजेत्या प्रथम येणाऱ्या संघास संघास रु. २५,००,०००/-, द्वितीय क्रमांक: रु. १५,००,०००/- तृतीय क्रमांक :रु.१०,००,०००/-, चतुर्थ क्रमांक : रु.५,००,०००/- शिस्तबद्ध संघ : रु. ३,००,०००/-, सर्वाधिक षटकार : १०००००/- , उत्कृष्ट फलंदाज रूपये १,००,००० /-, उत्कृष्ट गोलंदाज-रूपये १,००,००० /- उत्कृष्टक्षेत्र रक्षक रूपये १,००,०००/-, मॅन ऑफ द डे रूपये २५,०००/- आणि मॅन ऑफ द सिरीज मारुती आल्टो कार तसेच अनेक भव्य अशी रोख बक्षिस व ट्रॉफी आणि इतर वैयक्तिक बक्षिस देण्यात येणार आहे.
सदर भव्य अशा क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन दि १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सिने अभिनेत्री रिमी सेन यांचे हस्ते होणार आहे. तरी प्रभाग क्रमांक २६ मधील सर्व सर्व क्रिकेट टेनिस प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून बक्षिसाची लय लूट करावी असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

















