- ग्राहकांच्या ओळखीचा गैरवापर करून वस्तूंची परस्पर विक्री…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२५) :- पिंपरी येथील एका मार्केटींग कंपनीत तब्बल १ कोटी १ लाख ४५ हजार १८८ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विवेक नामदेव चव्हाण (वय ३७, रा. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २१ जून २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आरोपी अनिल सिद्धेश्वर हिवरे (वय २९, रा. रुपीनगर, चिखली) याने कंपनीच्या ग्राहकांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावाने बनावट ऑर्डर व बिले तयार केली.
या बनावट बिलांच्या आधारे आरोपीने कंपनीतून डिटर्जंट पावडर, शाम्पू, डायपर, डिओ व इतर गृह उपयोगी वस्तू परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर डिलिव्हरी बॉयच्या मदतीने या वस्तू इतर दुकानदारांना विकून कंपनीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे हे करीत आहेत.












