- विविध पक्षांच्या १७ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश घडवून पिंपरी चिंचवडच्या राजकारणात उडवून दिली खळबळ..
- विरोधकांचा यावर काय असेल पलटवार?..
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “तुमची-आमची भाजप सर्वांची” या भूमिकेतून विविध पक्षांतील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार स्वीकारल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र असून, शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेली नावे –
मा. महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेविका उषा वाघेरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ,
नवनाथ जगताप, अमित गावडे, मीनल यादव, रवी लांडगे, समीर मासुळकर, प्रविण भालेकर, जालिंदर शिंदे, सदगुरु कदम, प्रसाद शेट्टी, संजय काटे, आशा सूर्यवंशी यासह इतर पक्षांचे सचिन सानप, कुशाग्र कदम, डॉ. सहास कांबळे, दादा सुखदेव नरळे.












