न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आणि माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी श्री शिवसमर्थक भगवान अग्रेसन गोशाळा फाऊंडेशन या गोशाळेस दुष्काळानिमित्त गायींना चारा वाटप उपक्रम हाती घेतला. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमांतून ओव्हाळ यांनी जनसंपर्क वाढवला असून, दुष्काळग्रस्तांना एक हात मदतीचा देऊन आगळा-वेगळा वाढदिवस साजरा केला.
आकुर्डी येथील गुरुद्वारा आश्रम येथे फळवाटप, लोकमान्य हॉस्पिटल येथील रुग्णांना फळवाटप आदी विधायक उपक्रम शेखर ओव्हाळ यांनी वाढदिवसानिमित्त राबविले.
आरपीआय महाराष्ट्राचे उपाध्यक्ष दिपक निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते अमित मेश्राम, नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, प्रसाद शेट्टी, प्रशांत शितोळे, नगरसेवक रोहित आप्पा काटे, चेतन भुजबळ, अजिज शेख, बाबा कांबळे, आरपीआयचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, भरत लांडगे, गणेश जगताप, गिरीश जाचक, दिपक मेवानी, संदीप ढेरंगे, मल्लेश कदरापूरकर, शंकर मांडेकर, अमित वर्मा, संदीप गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन रितेश ओव्हाळ, अमोल जावळे, प्रेमल कडलग, गणेश कदम, अभिषेक ओव्हाळ, केवल शिंदे, सुप्रीम शिंदे, बंटी काटे, अजित ओव्हाळ, कुणाल वाव्हळकर, बाबा ग्रुप, महाराज प्रतिष्ठान, शेखर ओव्हाळ युवा मंचने केले.











