- भाजपच्या विकासाभिमुख विचारधारेवर वाढता विश्वास – आ. गोरखे..
- विविध पक्षांतील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा जाहीर प्रवेश…
© मा. अशोक लोखंडे – संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ डिसेंबर २०२५) :- देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे गतिमान नेतृत्व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी भाजपच्या विकासाभिमुख विचारधारेत सहभागी होत आहेत. हा पक्षप्रवेश केवळ राजकीय प्रवेश नसून, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्यावर व नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास असल्याचे स्पष्ट द्योतक मानले जात आहे.
आज झालेला पक्षप्रवेश पिंपरी विधानसभेचे आमदार अमित गोरखे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उमाताई खापरे तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शेट्टी व बाबर कुटुंबियांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…
भाजपा पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज शहरातील हॉटेल व्यावसायिक तसेच सामाजिक-राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख असलेल्या शेट्टी कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांनीही भाजपच्या विचारधारेसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, अमित प्रकाश बाबर, ऐश्वर्या बाबर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
तसेच माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास गोफणे, महेश गोफणे, महेश सहकारी बँकेचे अजय लढ्ढा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेटे, गणेश कंकावणे, ऋषी शेट्टी यांचाही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश झाला आहे.
या सलग होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होत असून, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय घडामोडींचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.












