- प्रचार फेरीदरम्यान भाजपच्या विनोद नढेंचा चुकीच्या आरक्षणाविरोधात निर्धार…
मा. संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 27 डिसेंबर 2025) :- प्रभाग क्रमांक २२ चे भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी शुक्रवारी पवनानगर कॉलनी क्रमांक 1, 2, 3 आणि 4 परिसरात भव्य प्रचार फेरी काढली. फेरीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी झाली. पत्रक वाटप यासह विविध उपक्रमांना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, परिसरातील सर्व गणेश मित्र मंडळांकडून नढे यांना जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला.
पवनानगर, काळेवाडी येथील सर्व्हे नं. 93 परिसरातील गोरगरीब रहिवाशांवर महानगरपालिकेच्या प्रशासकीय भोंगळ कारभारामुळे लादण्यात आलेल्या आरक्षणाचा प्रश्न सध्या चांगलाच पेटलेला आहे. या संदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन विनोद नढे यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
नढे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना, “चुकीच्या आरक्षणामुळे कोणत्याही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. कोणत्याही घरावर कारवाई केली जाणार नाही,” असा ठाम दिलासा दिला. याबाबत प्रशासनाशी योग्य तो पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि त्यांनीही आपली मते व अडचणी मांडत तातडीने तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली.












