- तिकीट वाटपात केशव घोळवे यांना डावलल्याने कामगार संघटनांकडून तीव्र निषेध…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 27 डिसेंबर 2025) :- भाजपने प्रभाग क्रमांक १० मध्ये माजी उपमहापौर केशव घोळवे यांचे तिकीट कापल्याने पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट झाला आहे.
दरम्यान श्रमिक एकता महासंघाने पत्रकार परिषद घेत भाजपच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. कामगार चळवळीत २५ वर्षे निस्वार्थ योगदान देणाऱ्या घोळवे यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप करण्यात आला.
कामगारांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या या नेत्याची उपेक्षा करून पक्षाने “अंतर्गत राजकारणाला” प्राधान्य दिल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. “मोठे होण्याची भीती” म्हणून तिकीट कापण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे कामगार वर्गात असंतोष निर्माण झाला असून पैशाच्या बळावर उभ्या उमेदवारांना धडा शिकवण्याचे आवाहन करण्यात आले.
या निर्णयामुळे भाजपची प्रतिमा धूसर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी निवडणुकीत याचे नकारात्मक पडसाद उमटू शकतात, अशी भावना व्यक्त होत आहे.












