- विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार विजयी होतील – शत्रुघ्न काटे..
- जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 27 डिसेंबर 2025) :- पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठी व लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 28 मधून सर्वप्रथम चारही नगरसेवक विजयी ठरणार असल्याचा विश्वास भाजपाचे उमेदवार व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला.
प्रभागात इच्छुक असलेल्या 12 उमेदवारांमध्ये कोणताही मनभेद नसून, “ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळेल, त्यांचे काम आम्ही एक कुटुंब म्हणून करणार आहोत,” असे काटे यांनी सांगितले.
भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदेवत श्री मुंजोबा मंदिरात आशिर्वाद घेऊन करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पासमोर अभिवादन करून प्रचाराचा शंखनाद झाला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन्स, रामनगर, कुणाल आयकॉन, रोझ लेक, गोविंद गार्डन यांसारख्या मुख्य वस्ती भागांत झालेल्या कामांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्षम व नागरिकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे काटे म्हणाले.
“प्रभागाच्या विकासासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एकजूट आणि समर्पणाच्या बळावर हा विजय निश्चित मिळवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. समस्या सोडवून प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी आम्ही अधिक ताकदीनं काम करू. पिंपळे सौदागर–रहाटणी आणि पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी आमचा संकल्प दृढ आहे.”
— मा. शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड…












